बँकेच्या खात्यातून 46 हजारांची रक्कम गायब

जरुडच्या राहुल वानखडे यांचेसोबत घडली अजब घटना

वरुड । 12 ऑगस्ट – स्टेट बैंक शाखा जरुड येथील 32393492904 या खात्यामधुन ऑनलाईन रकमेची अफरातफर झाल्याची तक्रार जरुड येथील राहुल वानखडे यांनी वरुड पोलिसात केली आहे. या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, मी जरुड येथे राहत असुन माझ्याजवळ मो.नं. 7972014461 हा नंबर होता. सदर्हु मोबाईल बंद पडल्याने 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजता जियोचे सिम बंद पडल्याने त्याकरीता आधार कार्ड अप डेड केल्याशिवाय सिम कार्ड चालु होत नाही त्यानुसार मी जरुड येथे आधार कार्ड अपडेड करायला सेतु केंद्रावर गेलो असता आधार अपडेड केल्यानंतर 12 ऑगस्ट 2025 रोजी माझे खात्यातुन अ‍ॅमेझान कंपनीचे मला रुपये 49 हजार 999 व 19 हजार 999, 19 हजार 999 व 999 रुपये याप्रमाणे रकमा माझ्या खात्यतुनकटल्याचे हे मला सकाळी 6 वाजता लक्षात आले. त्यानंतर मी सदर्हू बँकेत जावून घडलेला प्रकार सांगितला व त्यांनी माझे खाते बंद केले आहे. परंतु सदर्हू प्रकार कोण्यातरी अज्ञात इसमाने केलेला असावा, असा माझा संशय आहे याबाबत मला काहीच माहिती मिळु शकलेली नाही, त्यामुळे माझे आर्थीक नुकसान झालेले आहे, या प्रकरणाची चौकशी करुन मला न्याय मिळवुन द्यावा, अशी मागणी सुध्दा राहुल वानखडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button