राजूभाऊ चौधरी व विजय ठाकरे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश

आ.सुलभा खोडके यांनी केले स्वागत

अमरावती /31 डिसेंबर : जनहित साधायचे असेल तर निर्भीडपणे निर्णय कसे घ्यावेत याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री – नामदार – अजितदादा पवार हेच नाव सर्वांच्या मुखी आहे. केवळ याच गुणांमुळे सामाजिक हिताचे सत्वर निर्णय घेणारा निर्भीड नेता अशी अजितदादा पवार यांची प्रतिमा युवाशक्तीच्या मनात आकार घेत आहे. मानवी समाजाचा विकास हा केवळ भौतिक प्रगतीवर अवलंबून नसतो., त्यामागे काही मूलभूत मूल्यांची भक्कम पायाभरणी असते. या मूल्यांपैकी सर्वात महत्वाचे मूल्य म्हणजे सहिष्णूता होय. सहिष्णूता ही उद्याची नव्हे तर आजचीच गरज आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या विचारांमध्ये, वर्तनात आणि सामाजिक संबंधांमध्ये सहिष्णूतेचे मूल्य जपले पाहिजे. कारण सहिष्णूतेतच मानवतेचे भविष्य दडलेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ध्येय धोरणांना अनुसरून आमदार – संजय खोडके व आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांचे लोकसेवेचे कार्य अविरतपणे सुरु आहे. मृदुभाषी, संबंध जोपासण्याचे कौशल्य, कामात अचूकता, योग्य नियोजन, दांडगा जनसंपर्क या पंचसूत्रीचा अवलंब करीत आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांनी लोकसमस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्राधान्य देत आहे. अशातच बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी अमरावती येथील प्रभाग क्रमांक – 1 शेगाव – रहाटगाव परिसर स्थित संमती कॉलनी येथील रहिवासी -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राजूभाऊ चौधरी तसेच राम नगर क्रमांक- 2 आईश्री कॉलनी येथील रहिवासी भारतीय जनता पक्षाचे – विजय ठाकरे, राठी नगर स्थित भाजपाचे – श्याम साबळे, श्रीराम नगर स्थित भाजपाचे – सुनील भुजाडे, केवल कॉलनी स्थित -भाजपाचे – दादा वानखडे, प्रिया टाउनशिप स्थित भाजपाचे – सुधीर हांडे, पूर्वा टाउनशिप स्थित – भाजपाचे -प्रभाकरराव डोळस, प्रिया टाउनशिप स्थित – किरण भोरे, पद्मसौरभ कॉलनी स्थित भाजपाचे – गोवर्धन तेलखडे यासोबतच विद्यावैभव कॉलनी स्थित – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे – अविनाश गावंडे, आशियाड कॉलनी स्थित -काँग्रेसचे – राजूभाऊ भगत, अलहिलाल कॉलनी स्थित -काँग्रेसचे – सय्यद मुक्कतार, अनगळ नगर स्थित काँग्रेसचे – रवींद्र सिरसाट यांनी आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. या सर्व नवप्रवेशितांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन आमदार – सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी स्वागत केले.लोकशाही धोरणे बनवताना जर केवळ आकडेवारीवर आधारित निर्णय घेतले,तर ते कधी वास्तवात चालत नाहीत.

संबंधित बातम्या

Back to top button