राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय
मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर जहरी टीका

संवैधानिक संस्थांवरच हल्ले करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
नागपूर/27 सप्टेंबर : संपूर्ण देशभरातून केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. ज्ञानेश कुमार हे आयोगात मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप दोन निवडणूक आयुक्तांनीच केल्याने खळबळ उडाली. ज्यानंतर विरोधकांकडून आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मोर्चा सुद्धानिघणार आहे. तर काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. परंतु, निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ आता भाजपचे मुख्यमंत्री मैदानात उतरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांवर आणि विशेषतः राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे. व्होट चोरी म्हणणार्या विरोधकांचा, राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला असल्याचे म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी (27 सप्टेंबर) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले की, मला असे वाटते की काल तिन्ही निवडणूक आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांचा फेक नरेटिव्ह हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे राहुल गांधी यांच डिझाईन वेगळं आहे. संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेऊन संवैधानिक संस्थांवर रोज आरोप लावायचे, संवैधानिक संस्था प्रश्नांकित करायच्या, त्याच्यावरचा लोकांचा विश्वास उडवायचा अशा पद्धतीची कारवाई आहे. भारतीय संविधान ते जरी दाखवत असले तरी त्यांना या संविधानाने दिलेली लोकशाही काही मान्य नाहीये, या संविधानाने तयार केलेल्या संवैधानिक संस्था मान्य नाहीयेत, असा आरोपच फडणवीसांनी राहुल गांधींवर केला आहे.
बचत करून दुष्काळासाठी मदत करा-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संवेदनशीलता दाखविण्याची गरज आहे. खर्च कमी करणे तसेच केवळ आवश्यक गोष्टींवरच खर्च करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने बचत करून दुष्काळासाठी मदत करता येईल का हे पाहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.





