विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

स्व छायाताई खंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक उपक्रम

अमरावती /15 डिसेंबर : सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका तर्फे श्री श्रद्धानंद इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, रामपुरी कॅम्प रोड येथे स्वं छायाताई विनय खंडारे (पाटील) यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळा परिवारात मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ प्रा अरुण धनवटे व रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबीका चे अध्यक्ष अमोल चवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका यांच्या वतीने पाणी शुद्धीकरण यंत्र (ठज प्लांट) शाळेत स्थापना करून विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या प्रकल्पासाठी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका चे अध्यक्ष रोटेरियन अमोल चवणे , रोटेरीयन अतुल कोल्हे , प्राध्यापक गंगाधर पुसदकर ,रोटेटीयन पुजा कोल्हे , रोटेरीयन गौरव वानखडे , रोटेटीयन संतोष जांभे मुख्याध्यापिका भारतीय बोके,मालती ठाकरे यांचा विशेष सहभाग होता. उपस्थितांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. प्रकल्पप्रमुख रोटेरियन . अमीत कोहळे- यांनी सांगितले की, स्वच्छ पिण्याचे पाणी हे प्रत्येक विद्यार्थ्याचे मूलभूत आरोग्याधिकार आहे. रोटरी क्लब समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या आरोग्यवर्धनासाठी सातत्याने कार्य करत राहील. अध्यक्ष यांनीही शाळेमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचा आनंद व्यक्त करत सांगितले की,विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम हाती घेणे हे रोटरीचे प्राधान्य असून, पुढील काळातही शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अनेक योजना राबविण्यात येतील. कार्यक्रमास रेखा धनवटे ,डॉक्टर नीरज धनवटे डॉक्टर श्रद्धा धनवटे,किशोर बोरकर मनीष इंगोले,पी एस को हळे ,शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

संबंधित बातम्या

Back to top button