पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीच्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्युत अभियांत्रिकीच्या मल्लेश्वरी राजपूत यांना टांग सूडो स्पर्धेत सुवर्णपदक

अमरावती /21 जानेवारी : नुकताच दिल्ली येथे पार पडलेल्या 12 वी राष्ट्रीय टांग सू डो अजिंक्यपद स्पर्धेत पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, अमरावती येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या कु. मल्लेश्वरी राजपूत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्र संघासाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवून देत महाराष्ट्राचा तसेच महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
कु. मल्लेश्वरी राजपूत या विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनी असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे क्रीडा क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, संस्थेचे संचालक डॉ. पी. एम. खोडके, प्राचार्य पी. एम. जावंधिया, उपप्राचार्य डॉ. मो. झुहैर, विभागप्रमुख डॉ. एस. बी. वरकड, सहाय्यक विभागप्रमुख डॉ. पी. आर. राणे तसेच विभागातील सर्व प्राध्यापकांनी कु. मल्लेश्वरी राजपूत यांचे अभिनंदन केले. या यशामुळे महाराष्ट्रातील टांग सू डो खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी मल्लेश्वरी राजपूत यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

संबंधित बातम्या

Back to top button