नववर्ष दिनी अनुष्का डबलेकर या युवा विद्यार्थिनीचा सत्कार

अमरावती /6 जानेवारी : शहरातील गरीब नगर परिसरातील रहिवाशी रेखा व अविनाश डबलेकर या अतिशय संघर्षमय जीवन जगणार्या होतकरू दांपत्याची कन्या अनुष्का डबलेकर हिचा डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ तर्फे नववर्षाची पहाट तपोवनात या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
अनुष्का रेखा अविनाश डबलेकर ने भारत सरकारच्या कौशल्य विकास व उपक्रमशीलता मंत्रालयातर्फे आयटीआय महिला संस्था द्वारा एक वर्षीय मल्टीमीडिया निमेशन अँड स्पेशल इफेक्ट अभ्यासक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकाविला. तिच्या या कामगिरीसाठी मातोश्री कमलताई गवई व तिला शैक्षणिक सहकार्य करणार्या आनंद परिवाराचे सुदर्शन गांग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तपोवन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकता रॅलीचे पीबी इंगळे लप्पीभैया जाजोदिया आकाश शिरभाते प्राचार्य डॉ. शोभाताई रोकडे उषा करवा प्रभाताई आवारे उपस्थित होते.




