नागपूरच्या कुख्यात गुंडाला अमरावतीत अटक

राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात

अमरावती / 30 मे: नागपूरात अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या फरार कुख्यात गुंडाला अमरावती येथे म्हाडा कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हिमांशू दिनेश रॉय (22, इंदिरा नगर नं. 3, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या अरोपीचे नाव आहे. नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करुन तो फरार झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.
हिमांशू राय हा नागपूरातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर इमामवाडा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे 6 गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. त्यानंतर तो नागपूरातून फरार झाला होता. इमामवाडा पोलिस त्याच्या शोधात होते. दरम्यान हिमांशू रॉय हा अकोली परिसरातील म्हाडा कॉलनी येथे संशायास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार पुनित कुलट यांना मिळाली. त्यावरुन राजापेठ पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ म्हाडा कॉलनीत जावून हिमांशू रॉय याला अटक केली.
राजापेठच्या डीबी स्कॉडचे उपनिरिक्षक मिलिंद हिवरे, पोलिस कर्मचारी मनीष करपे, पंकज खटे, रवी लिखितकर, गणराज राउत, विजय राउत, सागर भजगवरे, अर्जून कदम, अमोल खंडेजोड यांनी ही कारवाई केली. हिमांशू रॉयला अटक करण्यात आल्याची माहिती नागपूर येथे इमामवाडा पोलिसांना देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button