मीना काळमेघ यांनी जोपासले 25 वर्षे रक्षाबंधनाची परंपरा

अमरावती /31 ऑगस्ट: दोन्ही डोळ्यांनी पूर्णतः दुष्ट बाधित असणार्या मीना कालमेघने मॅट्रिक नंतर बीए व नंतर राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेत अंधांचे डी एड केले. डी एड करताना डॉ. गोविंद कासट मित्र मंडळातर्फे 2003 मध्ये तिची वीस हजार रुपयांचे फी राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेत पोकळे बंधूंच्या मार्गदर्शक भरण्यात आली. डॉ. गोविंद कासट व रामराव व सुधाकर पोकळे बंधूंच्या सहकार्याने ती डीएड झाली. या आधारे तिने 2006 मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत चांदूरबाजार येथे विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले. पुढे मीना भीमराव काळमेघ विवाह नंतर मीना चंद्रकांत भोयर झाली. एकेकडची विद्यार्थिनी मीना आता आज शिक्षिका झाली. गेली 25 वर्षे डॉ. गोविंद कासट तिच्या निवासस्थानी न चुकता मीना रक्षाबंधनाला येते व परिवारातील सर्वांनी राखी बांधली.




