13 वर्षीय अल्पवयीन युवताचा विवाह

गरोधर झाल्याने घटना उघड : वडिलांविरुध्द गुन्हा

वरुड । 20 ऑक्टोबर – ‘ऐकावे तेवढे नवलच’ असे म्हटले तर वावगे ठरू नये. तिवसाघाट येथील अवघ्या 13 वर्षीय अल्पवयीन युवतीने लग्न लावून दिल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान, घटनास्थळी फिर्यादी महिला ही तिच्या वडिलांसह राहत असताना, तिच्या वडिलांनी कमी वयातच फिर्यादी महिलेचे लग्न आरोपी गणेश रामसेवक चौकीकर याच्याशी शंकरजीच्या मंदिरात लावून दिले. लग्नानंतर फिर्यादी महिला सासरी राहायला गेल्यानंतर आरोपी गणेश चौकीकर यांनी तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती झाल्याने प्राथमिक उपचाराकरिता सरकारी दवाखान्यात तपासणी करण्यात आली असता, तिला पुढील उपचारांसाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी फिर्यादी महिलेचे जबाब नोंदवून गाडगेनगर पोलिस स्टेशन, अमरावती येथे गुन्हा दाखल केला. हा गुन्हा ऑनलाईन स्वरूपात संबंधित पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला असून, त्यानुसार आरोपीविरुद्ध तपास सुरू आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले होते आणि त्यांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पिडीतेचा पती केरळ येथे कामावर असल्याची माहिती मिळाली असून, पिडीता सध्या अमरावती येथे उपचार घेत आहे. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून तिचे वडील गणेश रामसेवक चौकीकर (वय 32, रा. तिवसाघाट) यांच्या विरुद्ध कलम 64(3)(एम), 65(1) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button