बडनेर्‍यात कुणाल तेलमोरेची निर्घृण हत्या

एका अल्पवयीनासह तिघांना अटक

* काही तासांतच गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती /28 डिसेंबर – बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रहिवासी अठरा वर्षीय कुणाल विनोद तेलमोरे याला फोन करुन घरून बोलावून यांची माता फैल नजिक रेल्वे स्टेशन परिसरात रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
18 वर्षीय कुणाल विनोद तेलमोरे याची दगडाने ठेचुन हत्या केल्याप्रकरणी दोन अल्पवयीनसह दिनेश लक्ष्मण समुद्रे, वय-21 वर्ष, रा. तिलक नगर, बडनेरा तर दुसरा आरोपी पियुष किशोर भोयर, वय -19 वर्ष, रा. माताफैल, बडनेरा यांना गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐैरणीवर आला आहे. मृतक कुणाल हा बडनेरा जुनी वस्तीतील तेलीपुरा भागातील पवार वाडीतील रहीवासी होता. रात्री जेवण करत असतांना कुणालच्या मोबाईलवर फोन आला त्यानंतर रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास तो घाईघाईने स्कुटी घेवुन घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सकाळी बडनेरा रेल्वे स्थानकाच्या जुनी वस्ती भागातील सायकल स्टॅन्डच्या भिंतीलगत झुडपात त्याचा मृतदेह आढळुन आला. त्याच्या शरीरावर वार केल्याच्या जखमा होत्या. मृतदेहाच्या काही अंतरावरच त्याची स्कुटी उभी होती व स्कुटीचा आरसा फोडलेला आढळून आला. ही माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली असून शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल चव्हाण व त्यांचे पोलिस कर्मचारी तसेच आर.पी.एफ. चे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर फॅारेन्सीक टिमला पाचारण करण्यात आले. दरम्यान या गंभीर घटनेच्या तपासाची सुत्रे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली व अवघ्या काही तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. काही दिवसापूर्वीच साहील लॅान येथे आरोपी जितेश समुद्रे याचे काकाच्या मुलाला सुजल समुद्रे यास लग्न स्वागत समारंभामध्ये राघव बक्षी याने चाकु मारला होता. तो व्हिडीओ मृतक याने बनविला असुन सोशल मिडीयावर टाकायची धमकी आरोपी दिपेश समुद्रे याला देत होता. त्या कारणावरून मृतकाने दिपेश यास राय टाऊनशिप बडनेरा येथे अंदाजे 8 दिवसापूर्वी फोन करुन बोलाविले होते व मारहाण केली होती. त्या कारणावरुन आरोपी दिपेश याचे मृतकासोबत सतत वाद चालु होते. या जुन्या वैमनस्याच्या कारणावरुन आरोपींनी संगनमत करीत मृतकास जीवे मारण्याचे ठरविले होते. अशी कबुली पोलिसांना देण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांना गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ग्राम वरोरा परिसरातून ताब्यात घेतले. व पुढील तपासकामी बडनेरा पोलिस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलिस उपायुक्त मुख्यालय रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पि.एस.आय. मनिष वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश इंगोले , पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनोने, पोलिस अंमलदार फिरोज खान, गजानन ढेवले, मनोज गुडधे, सय्यद नाझीम, अतुल संभे, रंजित गावंडे, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, संदीप खंडारे, प्रभात पोकळे यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या जागी अरविंद चावरीया यांचा उल्लेख-गुन्हेशाखा अमरावती शहर पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये बडनेरा हत्येप्रकरणी माहिती देतांना पोलिस आयुक्त अरविंद चावरीया असा उल्लेख केलेला आढळून आला आहे. यावरून शहराला लाभलेले डि.आय.जी. दर्जाचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांना विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतो किंवा अनावधानाने ही चुक झाली का ? भविष्यात असे होवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button