आयटीआय मध्ये कोयत्याने मारहान

मित्राला वाचवताना विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

अमरावती /6 नोव्हेंबर गाडगेनगर परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय ) येथे आज दुपारी विद्यार्थ्यांमध्ये उद्भवलेल्या वादातून एका विद्यार्थ्याला कोयत्याच्या प्रहारात गंभीर दुखापत झाली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सत्रात दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळू नये म्हणून एक विद्यार्थी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला. मात्र, तेव्हाच काही युवकांनी रागाच्या भरात धारदार कोयत्यासारख्या शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढविला. हा विद्यार्थी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या खांद्यावर गंभीर प्रहार झाला, तसेच हातावरही जखमा झाल्या. जखमी विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमीचा जबाब नोंदविला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button