खा. डॉ. अनिल बोंडे यांना पुन्हा धमकीचा फोन

अमरावती/ 23 नोव्हेंबर – भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खा.डॉ. अनिल बोंडे यांना आज पुन्हा एका अज्ञात इसमाने फोन करून शिवीगाळ करीत खुप महागात पडेल अशी धमकी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी सुध्दा डॉ.बोंडे यांना अज्ञात इसमाने फोन व्दारे धमकी दिली होती हे विशेष- अमरावती शहरात लागलेले आय लव्ह मोहम्मद चे पोस्टरचा वाद असो की जिल्ह्यात गोवंश तस्करी व लव्ह जिहाद या सर्व प्रकरणावर खासदार बोंडे हे भाजपाकडून बोलत असतात यामुळे त्यांना यापुर्वी सुध्दा धमकीचा फोन आला होता. आता शनिवारी सुध्दा एका नंबरवरून त्यांना अज्ञात इसमाचा फोन आला. त्याने डॉ. बोंडे यांना शिवीगाळ करीत खुप महागात पडेल अशी धमकी दिली. या प्रकरणी डॉ. बोंडे यांच्याकडून त्यांचे स्विय सहायक रविकीरण वाघमारे यांनी राजापेठ पोलीसांत तक्रार नोंदविली असून या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात इसमाविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.




