जुन्या रामदेव बाबा मंदिराच्या विेशस्तांवर कारवाई करा

सकल हिंदू समाजाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

अमरावती /12 ऑगस्ट : स्थानिक प्रभात टॉकीजच्या मागे असलेल्या प्राचीन श्री रामदेव महाराज मंदिरात, श्रावण महिन्यात, जीर्णोद्धाराच्या नावाखाली, शिवलिंगासह भगवान गणेश आणि नंदी महाराजांच्या मूर्ती तोडण्यात आल्या आणि मूर्तींची विटंबना करण्यात आली. तसेच, यावर आक्षेप घेतल्यावर, मंदिराच्या विेशस्तांनी भाविकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच, त्यांचे वैयक्तिक फायदे लक्षात घेऊन, मंदिराचे विेशस्त मंदिरातील मूर्तींसह श्री रामदेव बाबांची समाधी तोडून मंदिर पाडण्याचा विचार करत आहेत. सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शहर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांना सादर केले. सादर केलेल्या निवदे नात अस े म्हटल े हाते े की, रविवारी, 10 आगॅ स्ट राजे ी सट्टु ीमळु े परिसरात असलल्े या शातं तचे ा फायदा घते मिं दर विेशस्तानं ी मिं दरातील मूर्तींची तोडफोड केली आणि विस्कळीत मतू र्ी त्या ठिकाणाहनू बाहेर टाकूण देण्यात आल्या. यानतं र, मिं दर विेशस्त श्री रामदेव बाबांची समाधी पाडण्याचा प्रयत्न देखील करतील. या निवेदनात असेही म्हटले आहे की, श्री रामदेव बाबा प्राचीन मंदिर शहराच्या मध्यभागी प्रभात टॉकीजजवळ आहे. या जागेची बाजारभाव किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत मंदिर संस्थेचे विेशस्त या ठिकाणी असलेले मंदिर काढून त्या ठिकाणी व्यावसायिक इमारत बांधून आपला आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर असे झाले तर या धार्मिक संस्थेचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. तसेच या मंदिरावर श्रद्धा असलेल्या भाविकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जातील. अशा परिस्थितीत, सखोल चौकशी करण्याबरोबरच, या मंदिर संस्थेच्या विेशस्तांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, नकाशा आणि बांधकामाची तपासणी करून आवश्यक परवानगी घेऊन सदर ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे बांधकाम तात्काळ थांबवावे. तसेच, मंदिरात ठेवलेल्या मूर्तींची तोडफोड करणार्‍या विेशस्तांना तात्काळ अटक करावी. निवेदन देताना विेश हिंदू परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय बजरंग दल, हिंदू हुंकार संघटना, श्री राम सेना, जय भवानी मित्र परिवार, गौड ब्राह्मण युवा सेना, महाराष्ट्र हिंदुत्व संघ, हिंदुत्व संघ, महाराष्ट्र हिंदुत्वनिष्ठ संघ आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button