तुमचं नाव मतदान यादीत आहे का? लगेच तपासा

आ.सुलभा खोडके यांचे आवाहन

* मताधिकार वोटर सर्च अँप द्वारे नाव शोधण्याचे आवाहन

अमरावती /17 डिसेंबर : आगामी 15 जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनपाच्या वतीने मुळ प्रारूप मतदार यादी-2025 हि मतदार सुची जारी केली आहे. येत्या 27 डिसेंबर रोजी मतदार केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.त्यामुळे मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा व्हावी म्हणून राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र ने मताधिकार वोटर सर्च अँप तयार करण्यात आले आहे. शहरातील मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी सदरचे अँप डाऊनलोड करून मतदार यादीत नाव शोधण्याचे आवाहन आ.सुलभा संजय खोडके यांनी केले आहे.
अमरावती महानगर पालिका निवडणूक 2025-2026 च्या अनुषंगाने महापालिकेने मूळ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. ज्यामध्ये सर्व 22 प्रभागातील मत दारांचा समावेश आहे. येत्या 27 डिसेंबर ला मनपाची प्रभाग निहाय व मतदान केंद्र निहाय सुधारित मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे मत दारांना आपले नाव कोणत्या प्रभागात व मतदान केंद्रांवर आहे, हे तपासण्याची व शोधण्याची सुविधा व्हावी, याकरिता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रने मताधिकार वोटर सर्च अँप तयार केले असून https://play. google.com/store/apps/details?id=com.stateelection2pcampaignid=webšshare या लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (एझखउ) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच ऍप्पच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. शहरातील मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी सदरचे अँप डाऊनलोड करून मतदार यादीत नाव शोधण्याचे आवाहन आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button