उद्योग व्यवसायामुळे विदर्भ होईल समृध्द

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

* ‘एडवांटेज विदर्भ : खासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप
* 42 हजार कोटींचे सामंजस्य करार

नागपूर/8 फेब्रुवारी – नागपूरसह संपूर्ण विदर्भात विकासाची अनेक कामे होत असल्यामुळे देशविदेशातील गुंतवणूकदार उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी प्राधान्य देत आहे. गत तीन दिवसांत तब्बल बेचाळीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार औद्योगिक महोत्सवादरम्यान झाले आहे. विदर्भातील खनिज संपत्तीमुळे आगामी काळात कृषी व्यवसाय, वन पर्यटन वाढणार याशिवाय अनेक क्षेत्रात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विदर्भ अधिक समृध्द होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर विद्यापीठाच्या परिसरात असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित एडवांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग (एमएसएमई )राज्यमंत्री करंदलाजे, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, लॉईड मेटल्स अँड एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, माजी महासंचालक पद्मश्री डॉक्टर व्ही.के.सारस्वत, जिल्हाधिकारी विपीन, प्रबंधकीय संचालक श्रावण हर्डीकर, उपाध्यक्ष टाटा स्टील- डी बी सुब्रह्मण्यम, निखिल मुंडले, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे रविंद्र गुमास्ते, सेबीचे सोनपरोते, महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीना हात्तीबेड, सत्तापक्षनेते नरेंद्र बोरकर, आ.आशिष आदींची उपस्थिती होती. नितीन गडकरी पुढे म्हणाले, तीन दिवसीय महोत्सवात प्रामुख्याने 23 देशांचे राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींची उपस्थितीमुळे एडवांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाला आंतरराष्ट्रीय एक्सपोजर मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. यंदाच्या महोत्सवात विविध देशांचे राजदूत तसेच 52 बिझनेस-टू-बिझनेस आयोजित करण्यात आल्याने स्थानिक उद्योग व्यवसायिकांना नवीन संधी मिळणार आहे. यानंतर 25 विशिष्ट औद्योगिक सेक्टर लक्षात घेवून त्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
रिंग रोड लगत मेट्रो धावणार-नागपूरच्या सभोवताल असलेल्या रिंग रोड लगत मेट्रो सुरु करण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे आगामी काळात रिंगरोड लगतच्या मार्गावर मेट्रो धावताना दिसणार आहे. याशिवाय फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानावर चालणार्यार 135 बसेस नागपूर शहरात धावताना दिसणार आहे. यामुळे आरामदायी प्रवासाचा आनंद मिळणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांत पाइपलाईन द्वारे गॅस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे णपळेप चळपळीींशी छळींळप ॠरवज्ञरीळ नितीन गडकरी यांनी सांगितले.
कौशल्य विकासाला प्राधान्य
देशातील 33 कोटीच्यावर उद्योजकांनी एमएसएमई पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली असून एमएसएमई मंत्रालय कौशल्य विकासाला प्राधान्य देत येत आहे. सबसिडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगाची संख्या वाढत असल्याची माहिती केंद्रीय (एमएसएमई )मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, आपल्या देशाच्या विकासात मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग (एमएसएमई) हे खरे भागीदार असून भारताच्या जीडीपी(सकल देशांतर्गत उत्पादन 40टक्के तर एकूण निर्यातीत 40 टक्के आणि एकूण उत्पादनात 45 टक्के वाटा आहे.
गडचिरोलीचे विद्यार्थी ऑस्ट्रेलियात-गडचिरोली जिल्ह्यातील 18 विद्यार्थी मायनिंग अँड मेटलर्जी अभियांत्रिकी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटी येथे रवाना होणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. लॉईड मेटल्स अँड व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला आहे.
सामंजस्य करार व सत्कार-समारोप कार्यक्रमादरम्यान एड-टेक क्षेत्रात ‘लर्न कोच’ आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अंतर्गत लर्निंग स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. सुनील फेरो अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड विदर्भात 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तसेच आरोह हॉस्पिटॅलिटी आणि महिंद्रा सिग्नेचर यांच्यात फाईव्ह स्टार रिसॉर्ट उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. याशिवाय एमएसआरडीए सोबत 1,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी व्हीआयपीएलचे प्रशांत उगेमुगे यांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button