रूग्णालय येथे ’हॉस्पिटल कॉलिटी वीक’ उत्साहात
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व

अमरावती /21 जानेवारी : रूग्ण सेवा अधिक सुरक्षित, दर्जेदार व रूग्णकेंद्रित करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे दिनांक 13 ते 17 जानेवारी या कालावधीत ’हॉस्पिटल कॉलिटी वीक’ उत्साहात साजरा करण्यात आला. या गुणवत्ता सप्ताहादरम्यान रूग्ण सुरक्षा, संसर्ग नियंत्रण, औषध व्यवस्थापन, रूग्णांचे हक्क, रूग्ण समाधान याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले. रूग्ण सेवेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर, परिचारिका तंत्रज्ञ तसेच इतर कर्मचारी यांच्यासाठी एनएबीएच मार्गदर्शक तत्वे, दर्जेदार सेवा व रूग्ण सुरक्षा यावर विशेष प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. या अंतर्गत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी माहितीपर मार्गदर्शन, पोस्टर स्पर्धा, गुणवत्ता मेळा, दर्जेदार आहार मेळा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, लघु व्याख्यानमाला, रूग्ण शिक्षण चर्चा तसेच गुणवत्ता हमी व सुरक्षिततेविषयी उपक्रम राबविण्यात आले. यासोबतच उभिप्राय संकलन कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ रूग्णालय, रूग्ण सुरक्षा व आरोग्यविषयक माहिती यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमाचे ’झेुशी ‘Power of Q-Think Out of the Box’’ हे प्रभावी ब्रीदवाक्य असून, संपूर्ण गुणवत्ता सप्ताहाची रूपरेषा डॉ. प्रियंका गौतम यांनी तयार केली. सेवाभाव व जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली असून रूग्ण सुरक्षा, वेळेवर उपचार व दर्जेदार काळजी घेणे हेच रूग्णालयाचे प्रमुख ध्येय आहे.




