पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौर्यावर

अमरावती /9 नोव्हेंबर – राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जि ल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावन कुळे हे आज, सोमवार 10 नोव्हेंबर रोजी अमरावती दौर्यावर आहेत. या दौर्यात ते जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक आणि पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. बावनकुळे सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून कारंजा, तिवसा, कुर्हा मार्गे चांदूर रेल्वेकडे प्रस्थान करतील. सकाळी 11 वाजता चांदूर रेल्वे येथील रॉयल पॅलेस येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.दुपारी 1 वाजता कोंडेश्वर येथे सुजलशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळ आयोजित विपश्यना केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता अभियांत्रिकी भवन, अमरावती येथे भाजपा पक्ष मेळाव्यात सहभागी होतील.यानंतर दुपारी 3.30 वाजता अमरावतीहून वरुडकडे प्रस्थान करतील. वरुड येथे आगमनानंतर अष्टविनायक सभागृहात आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. सायंकाळी 6 वाजता वरुडहून काटोल मार्गे नागपूर विमानतळावर जातील आणि तेथून विमानाने मुंबईकडे रवाना होतील. रात्री 10.55 वाजता त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल आणि मुंबई येथे त्यांचा मुक्काम राहील.




