हिवरखेड-अवैध गर्भपात प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत
आ.अमोल मिटकरी यांच्या स्टिंग ऑपरेशनची दखल

अकोला/4 डिसेंबर – जिल्ह्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर जिल्हा परिषदेने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन गठीत करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराची बातमी दाखवली होती. ’माझा’च्या बातमीच्या दणक्यानंतर लगेच अकोल्याचे जिल्हा परिषद प्रशासन आणि त्यांचा आरोग्य विभाग खडबडून जागा झालं आहे. या बातमीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी हिवरखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात केले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यासंदर्भातील बातमी ’एबीपी माझा’ने दाखवल्यानंतर आज जिल्हा परिषदेने एक चार सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राला सरकारने ’आयुष्यमान आरोग्य मंदिरा’चा दर्जा दिला आहे. मात्र, याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. या आरोग्य केंद्राचं ’स्टिंग ऑपरेशन’च आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. आमदार मिटकरींनी केलेल्या पाहणी आणि ’स्टिंग ऑपरेशन’मध्ये त्यांना रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मासाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याची गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय.




