बसपाच्या माजी नगरसेविका इशरत बानो यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
काँग्रेसचे अब्दुल अक्रम देशमुख यांनीही बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

अमरावती /26 डिसेंबर : आगामी अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास दर्शवून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाकडे कल व आकर्षण वाढत आहे. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असून पक्षप्रवेश केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या नवीवस्ती बडनेरा येथील माजी नगरसेविका इशरत बानो यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्याचबरोबर बडनेरा भागातील काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुल अक्रम अब्दुल आहद देशमुख यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक महासचिव आ.संजय खोडके तसेच आ.सुलभा खोडके यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच त्यांना प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेरामधून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. यावेळी युवा नेते श्री. यश खोडके हे देखील उपस्थित होते. माजी नगरसेविका इशरत बानो व अब्दुल अक्रम देशमुख यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी महायुती सरकार मध्ये राहून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाचे व हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाचे विदर्भातील नेते आ.संजय खोडके व अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरु असतांना सर्व समाजघटक व सर्वसमावेशक जनता राष्ट्रवादीच्या प्रवाहात येतांना दिसत असून अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेरामधील इशरत बानो तसेच अब्दुल अक्रम अब्दुल आहद देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश तसेच त्यांना प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेरामधून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आल्याने बडनेराच्या अल्पसंख्याक भागात राष्ट्रवादीचा बोलबाला वाढला आहे. यावेळी गफूर शेख, निलेश शेगोकार ,आफताब भाई, पिंटू खंडाळकर, फिरोज खान गदर, सादिक भाई गदर , जावेद कादरी, आदींसह सहकारी उपस्थित होते.




