अमरावतीमध्ये तहानलेल्या पक्षांसाठी जलपात्र वाटप
एकलव्य व्यायाम मंडळाचा स्तुत्य उपक्रम

* शेकडो नागरिकांनी घेतला उपक्रमात सहभाग
अमरावती/30एप्रिल- तप्त उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकणार्या पशू-पक्षी यांच्या तृष्णातृप्तीसाठी एकलव्य व्यायाम मंडळाने पुढाकार घेत शेकडो नागरिकांना पाण्याचे भांडे वाटप केले. प्राध्यापक सुभाष गावंडे आणि समाजसेवक योगेश सर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रेरणादायी उपक्रम पार पडला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोठी जनजागृती निर्माण झाली आहे. मंगळवारी एकलव्य व्यायाम मंडळातर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमात अनेक पक्षीप्रेमी आणि नागरिक एकत्र आले होते. वाढत्या उन्हाच्या झळांनी पक्षी त्रस्त झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला. शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष गावंडे आणि गाडगे नगरचे समाजसेवक योगेश सर्वे यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांना पक्षांसाठी दाणे आणि पाणी ठेवण्याचे भांडे वाटण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रू खंडोडे, नितिन हिवरोडे, विभू लोखंडे, सागर यादव, नानाभाऊ मोहोड, प्रशांत सोळंके, पंकज जांभळ, संदीप हटकळ, दिलीप बोबडे, संदीप भोगे, किशोर दहिवडे, बाल्या बोंडे यांच्यासह देशमुख काका आणि देशमुख काकू यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली. कार्यक्रमात उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून, उन्हाळ्याच्या दिवसात हा प्रयत्न अतिशय मोलाचा ठरत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीही यातून प्रेरणा घेतली आहे.




