रोटरी क्लब अंबानगरी यांचे सहकार्याने गरजू रूग्णांना श्रवणयंत्राचे वाटप

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

अमरावती /30 डिसेंबर : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमित्त डॉ. पंजाबराय उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, शिवाजीनगर, अमरावती येथे गरजू रुग्णांना श्रवणयंत्राचे वाटप शनिवार, दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. हा उपक्रम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब अंबानगरी यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. शाह प्लास्टीक इंडस्ट्रीजचे संचालक श्री भावीकजी सुधीरभाई शाह यांच्या आर्थिक सहकार्यामुळे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनाजी देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम यशस्वी रित्या पार पडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांचे शुभहस्ते श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. सोमेश्वर निर्मळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोहोड, ई. एन.टी. विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. अनिल पाटील, डॉ. गिरीश तापडीया, डॉ. रवी गणेशकर, डॉ. प्रिती ठाकरे, रोटरी अंबानगरीचे अध्यक्ष रोटे नितिन गुप्ता, पूर्व अध्यक्ष रोटे प्रशांत करवा, एंक्लेव चेअर रोटे नंदकिशोर राठी, असिस्टंट गवर्नर रोटे सचिन देशमुख, रोटे उदय कालमेघ, रोटे अजय लोया, रोटे आशीष बाकोडे, प्रकल्प प्रमुख रोटे डॉ. ऋषिकेश नागलकर, सेक्रेटरी प्रोजेक्टस रोटे संतोष मालानी, डॉ. ऋषिकेश सावदेकर, डॉ. गिरीश तापडीया, डॉ. गौरव भुतडा, डॉ. संजीव जयस्वाल उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button