दिनेश बुब कार्यालयात सायकल प्रदान

अमरावती /25 फेब्रुवारी : सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ यांच्या आजाद गणेशोत्सव मंडळ डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ तर्फे दिनेश भाऊ यांनी एका होतकरू भगिनींना तीन चाकी सायकल प्रदान व स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्कार करण्यात आला.
भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रदीप भाऊ यांच्या अध्यक्ष स्थानी होते तर कार्यक्रमास विजय संतान राजेंद्र पेलागडे डॉ. राजू डांगे काशिनाथ फुटाणे प्राचार्य डॉ. प्रकाश काळबांडे डॉ. सतीश वडनेरकर डॉ. अजय साखरे श्रीकांत शेगोकार निलेश ठाकरे जीवन व वैशाली गोरे उमेश वैद्य रितेश बुब डॉ. गोविंद, शरद, डॉ. रवींद्र व प्रदीप हे कासट मंडळी हजर होते तसेच दिनेश बुब परिवारातील कार्यकर्ता मंडळी रुग्णाच्या नातेवाईकांसाठी जेवण असलेली लाभार्थी मंडळ हजर होती.
मित्र मंडळाच्या कार्यक्रमात कार्यक्रम प्रथेनुसार प्राचार्य एस व्ही शिरभाते यांचा वाढदिवस व मित्रमंडळातील जीवन व वैशाली गोरे या दांपत्याच्या विवाह वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजू डांगे यांचे सर्व भाषण झाले. दिनेश बुब यांनी सत्काराप्रती सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप कासट तर संचालन आभार डॉ. गोविंद कासट यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button