धाने पाटील याचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जोरदार स्वागत

* शिवसेना भवनात जल्लोष

* उबाठा शिवसेनेला मोठा धक्का

अमरावती /10 जून: बडनेरा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेेशर धाने पाटील यांनी मंगळवारी दुपारी मुंबई येथील शिवसेना भवनात आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश घेतला. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः धाने पाटील यांच्या गळ्यात भगवा दुपट्टा घालून आणि हातात भगवा झेंडा देऊन पक्षात स्वागत केले. धाने पाटील यांच्यासह सुमारे 225 पदाधिकारी आणि शिवसैनिक पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यावेळी धाने पाटील यांच्यासह सुनील राऊत, योगेश धर्माळे, श्याम धाने, अण्णा उमक, विजू लाहे आणि युवा सेना आणि महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. काही महिन्यांतच, आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात उबाठा शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. उल्लेखनिय असे की, महिन्याभरापूर्वी माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनीही शेकडो समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना-शिंदे गट मजबूत झाला आहे, असा दावा राजकीय तज्ज्ञ करत आहेत. धाने पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रीती बंड यांच्यासाठी काम केल्यापासून धाने पाटील यांचे शिवसेनेशी असलेले संबंध बिघडले होते. ते बडनेरा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button