विद्रुप स्थितीत आढळला वृध्द महिलेचा मृतदेह

जरुड ते बेनोडा (शहीद) महामार्गानजीक पांदण रस्त्यावरील घटना

वरुड । 3 ऑक्टोबर – ठोकमध्ये भाजीपाला खरेदी करुन तालुक्यातील विविध आठवडी बाजारांमध्ये त्याची चिल्लर विक्री करीत पोटाची खळगी भरणार्‍या 60 वर्षीय महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह जरुड ते बेनोडा (शहीद) महामार्गावरील सव्वालाखे यांचे शेतानजीकच्या पांदण रस्त्यावर आढळल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे मृत महिलेच्या डोक्यावर गंभिर दुखापत असून तिची चेहरा पुर्णत: विद्रृप आढळून आला. आज सकाळी 9.30 च्या सुमारास काही शेतकरी शेतात जात असतांना त्यांना हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती मिळताच वरुड पोलिसांनी तात डीने घटनास्थळ गाठुन मृतदेहाचा पंचनामा करुन तपासकार्य आरंभिले होते. घटनास्थळावर ठसे तज्ञ, डॉग स्कॉटसह आरोपीचा शोध घेण्यात आवश्यक त्या सर्व पर्यायांचा शोध घेत पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्याच्या मार्गावर आहेत. उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह अन्य पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली. प्राप्त माहीतीनुसार, बेनोडा (शहीद) येथील रहिवाशी असलेले सरस्वती बाबुराव उईके नामक 60 वर्षीय महिला गेल्या अनेक वर्षांपासुन ठोकमध्ये भाजीपाला खरेदी करुन तालुक्यातील विविध आठवडी बाजारांमध्ये त्याची चिल्लर विक्री करीत होती. काल (ता.2) रविवारी घटनास्थळापासुन जवळच असलेल्या जरुड येथील आठवडी बाजार असल्याने सरस्वती ही दुपारपासुन जरुडच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचे दुकान लावुन बसली होती. रात्रीच्या सुमारास भाजीपाला विक्री संपल्यानंतर वजनकाटा व इतर साहित्य घेवुन सरस्वती ही बेनोडा (शहीद) गावाकडे जात असतांना जरुड आणि बेनोडा (शहीद) गावामध्ये मधात सचिन सव्वालाखे यांचे शेताकडे जाणार्‍या पांदन रस्त्याकडे ती
कशी गेली? तिला तिकडे कोणी नेले? ती पायदळ गेली की तिला कोणत्या वाहनाने नेण्यात आले? यासह अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आज सकाळच्या सुमारास रमेश गवळी हे त्यांच्या शेताकडे जात असतांना सकाळी 9.30 च्या सुमारास एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला. घाबरलेल्या स्थितीत त्यांनी आजुबाजुच्या शेतकर्‍यांना माहीती दिल्यानंतर अनेकांनी घटनास्थळ गाठले आणि पोलिसांना माहीती दिली. वरुड पोलिसांसह बेनोडा (शहीद) पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता भयावह चित्र पुढे आले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह अन्य पोलिस अधिकार्‍यांना सुध्दा पाचारण करण्यात आले. सदर महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून तिच्या बलात्कार करुन तर तिचा खून तर करण्यात आला नाही ना? असा संशय व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे जी घटना घडली यावरुन असे निदर्शनास येते की, या प्रकरणात किमान दोन आरोपी असावेत, असा संशय व्यक्त केल्या जात आहे. घटनास्थळावर ठसे तज्ञ, डॉग स्कॉटसह तपास कार्यामध्ये आवश्यक त्या सर्व गोष्टींची बाबींची पडताळणी पोलिसांकडून केल्या जात आहे. तपासकार्यामध्ये उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर, वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, बेनोडाचे ठाणेदार विवेक देशमुख यांचेसह जरुड बिट जमादार मिनेश खांडेकर व त्यांचे सहकारी मदत करीत आहेत. वरुड पोलिसांनी अज्ञातांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

Back to top button