आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून मामाकडून भाचीचे ब्लॅकमेलिंग

व्हायरल करण्याची धमकी, सबंधांसाठी तगादा

-वडिलांना मागितली 10 लाखांची खंडणी
अमरावती / 6 जुलै: नात्याने आत्ये मामा असलेल्या एका नराधमाने तरुणीला केकमधून बहोशीचे औषध दिले. ती अत्यवस्थ अवस्थेत असताना तिचा विनयंभंग केला व तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने तरुणीकडे संबंध ठेवण्याचा तगादा लावला. एवढेच नाही तर तरुणीच्या वडिलांनाही नातेवाईकांकडे बदनामी करण्याची धमकी देत शिवीगाळ केली आणि 10 लाखांची खंडणी मागितली. याबाबत तरुणीने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
नितीश शंकरराव वडनाईक (38, रा. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. नितीश हा पिडित तरुणीच्या आईचा नात्याने आत्येभाउ आहे. डिसेंबर 2019 मध्ये तरुणी आणि नितीश यांची एका कौटुंबिक कार्यक्रमात ओळख झाली नंतर ते फोनवरुन संपर्कात होते. डिसेंबर 2021 मध्ये तो अमरावती येथे काही दिवस तरुणीच्या राजापेठ परिसरातील घरी मुक्कामी होता. तेव्हा महाविद्यालयात एक तरुण या युवतीला त्रास देत असल्याने तिची मदत करण्याच्या बहाण्याने नितीशने तरुणीशी जवळीत साधली. त्यानंतर नातेवाईकाकडे नागपूर येथे लग्न असल्याने तरुणी तिच्या आईसह 10 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान नितीशकडे मुक्कामी होते. तेव्हा घरात नितीश आणि तरुणी एकटेच असताना त्याने तरुणीला केक खाण्यासाठी दिला. त्यात त्याने बेहोशीचे औषध मिसळले होते. केक खाताच तरुणी अत्यवस्थ झाली. त्यानंतर नितीशने तिचा विनयभंग करुन तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले.
त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत त्याने तरुणीकडे संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. जानेवारी 2022 मध्ये त्याने अमरावतीच्या सांस्कृतिक भवन परिसरात युवतीला बोलाविले आणि तेथेही तिच्याशी लगट करुन विनयभंग केला. घाबरलेल्या पिडितेने तेव्हापासून नितिशसोबत संबंध तोडले होते. तिने त्याचा मोबाईलही ब्लॉक केला होता. त्यानंतर नितीश बडनाईक याने तरुणीच्या वडिलांना 27 एप्रिल 2025 रोजी मॅसेज पाठवून फोटो व व्हिडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर सतत तो तरुणीच्या वडिलांना मॅसेज करुन ब्लॅकमेल करित होता. एवढेच नाही तर 4 जुलै रोजी त्याने मॅसेज पाठवून जर मुलीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होउ नये, असे वाटत असेल तर 10 लाख रुपये द्यावे, असे सांगून खंडणीची मागणी केली.
नितिश बडनाईकच्या जाचाला कंटाळून अखेर तरुणी आपल्या वडिलांसोबत राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यांनी नितिशच्या विरोधात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button