भाजप हा मोठा भाउ, धडझ कार्यकर्त्यांचा युतीसाठी एकमुखी ठराव!

आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न

* युती न झाल्यास सर्व जागांवर लढण्याचा निर्धार

अमरावती/ 12 नोव्हेंबर – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची कोअर कमिटी बैठक समर्थ हायस्कूलजवळील पँटलून हॉटेल येथे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख तथा महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपासोबत युती करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठराव केला की भाजप हा मोठा भाऊ असून शक्य तितक्या ठिकाणी भाजपासोबत युती करावी. यावेळी चर्चेदरम्यान हेही ठरविण्यात आले की, जर युती झाली नाही तर युवा स्वाभिमान पार्टी मैत्रीपूर्ण पद्धतीने सर्वच जागांवर निवडणूक लढवेल. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली असून प्रत्येक ठिकाणी पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत पक्षाचे प्रवक्ते नाना आमले यांनी सांगितले की, भाजपासोबत युती करण्याचा किंवा स्वतंत्र लढण्याचा अंतिम निर्णय आमदार रविभाऊ राणा घेतील. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मत राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला आ. रवी राणा यांच्यासह सुनिल राणा, जयंत वानखेडे, शैलेंद्र कस्तुरे, ड. नंदेश अंबाडकर, विनोद जायलवाल, प्रा. अजय गाडे, समाधान वानखडे, डॉ. आशिष मालू, कमल किशोर मालानी, ज्योती सैरीसे, सोनाली नवले, सुमती ढोके, संजय हिंगासपुरे, शिवदास घुले, गणेशदास गायकवाड, सुखदेव तरडेजा, हरीश चरपे, बाळु इंगाले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच राजेंद्र गुर्जर, नितीन बोरेकर, गंगाधर आवारे, सचिन भेंडे, संजय मुनोत, दिनेश सेठिया, प्रा. सतीश खोडे, किशोर पिवाल, विनोद गुहे, मंगेश इंगोले, आशिष कावरे, विलास वाडेकर, रामकुमार खैरे, उमेश डकरे, राजकुमार बैस, अजय घुले, अविनाश काळे, श्रीकांत इंगळे, रत्नाकर चरडे, दिपक जलतारे, सुधीर लवणकर, पवन हिंगणे, प्रा. प्रभाकर अंबाडकर, शुभम उंबरकर, धर्मेश पारेख, आतिश इंगळे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पक्षाची निवडणुकीतील तयारी अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले. सभेचा शेवट जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
धडझ ची राजकीय भूमिका
भाजप हा मोठा भाऊ – युतीसाठी धडझ कार्यकर्त्यांचा ठराव
युती न झाल्यास सर्व जागांवर मैत्रीपूर्ण लढाई
युतीचा अंतिम निर्णय आ. रविभाऊ राणा घेणार
कोअर कमिटी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

संबंधित बातम्या

Back to top button