भाजपचे उमेदवार राजेंद्र सिंह सोमवंशी यांचे नगराध्यक्ष पदासाठी नामांकन

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ सुध्दा रिंगणात

समर्थकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

चिखलदरा /17 नोव्हेंबर – नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात उलटफेर पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करुन राजकीय वर्तुळात धक्का दिला आहे. त्यांनी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपचे पदाधिकार्‍यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करुन लक्ष वेधले.
आ.रवि राणा यांच्या पुढाकाराने 13 नोव्हेंबर रोजी चिखलदरा येथील हर्षवर्धन हॅाटेलमध्ये बैठक घेवुन चिखलदरा येथे भाजपमय वातावरण केले. तसेच मुख्यमंत्री यांचे नातेवाईक आल्हाद कलोती येथुन नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे चिखलदरा येथील भाजपची बाजु मजबुत झाली आहे. राजेंद्र सिंह सोमवंशी यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोमवंशी यांच्या कार्यप्रणालीस प्रभावित होवुन काँग्रेसचे उमेदवार अब्दुलभाई पुढाकार घेतांना दिसले. नामांकन अर्ज दाखल करतांना भिकमचंद खंडेलवाल, खेमराज तिवारी, सचिन मिश्रा, नीलेश कुलकर्णी, कलोती, शुभम मिश्रा, अन्सार भाई, ओमप्रकाश मिश्रा, जितेंद्र पाचोरी, सूरज तिवारी, वेदांत सुरपाटणे, अन्वर हुसेन, अरुण तायडे, शफी भाई, अज्जू भाई, तिलक मिश्रा, अनुप ठाकूर, मनोज शर्मा, गुरु ठाकूर, राजेश मांगलेकर, विलास पाल आणि मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

Back to top button