भारतीय संस्कार ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

अमरावती /11 डिसेंबर : बडनेरा येथील द मॉडर्न एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित भारतीय संस्कार ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलचे नुकतेच दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी सांस्कृतिक भवन अमरावती येथे मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ’ठरळपलेु’ 2025 वार्षिक स्नेहसंमेलन मोठा जल्लोषात पार पडले. संमेलनाचे प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक माननीय. श्री. प्रकाश भाऊ बनसोड आणि द मॉडर्न एज्युकेशन सोसायटी निमित्त राजेश्वर युनियन हायस्कूल व ज्यू महा. चे मुख्याध्यापक श्री. सत्यन राघोर्ते सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी बॉलीवूड थीम व ऐतिहासिक थीम यांचे भव्य व आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मन जिंकली. बॉलीवूड थीम मधून झगमगत्या वेशभूषा लोकप्रिय गाण्यावरती नृत्य त्यांच्या लयबद्ध प्रस्तुतीनीं सभागृहात खव्या चित्रपटसृष्टीची अनुभूती दिली. तसेच ऐतिहासिक थीममधून मराठा साम्राज्य, मुगल साम्राज्य , व स्वातंत्र चळवळीतील लढत यावरती आधारित नृत्य सादरीकरणातून उपस्थिताना भारतीय इतिहासाचा अभिमान पुन्हा जाणून दिला.कनिष्ठ विद्यार्थ्यापासून ते वरिष्ठ विद्यार्थ्यापर्यंत सर्वांनी उत्कृष्ट समन्वय, आत्मविश्वास आणि कलात्मकता दाखवली. यामध्ये जास्तीत जास्त 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी भरभरून उपस्थित राहून संपूर्ण सभा गृह गजबजून गेले. प्रमुख अतिथी प्रकाशभाऊ बनसोड सर व राघोर्ते सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नृत्यांचे व सादरीकरणाचे शिस्तीचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या संमेलनात प्रोत्साहनाची भर घालवण्यासाठी द मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, उपाध्यक्ष मा. श्री राजेशजी लढ्ढा, सचिव मा. श्री शिवकुमारजी अग्रवाल कार्यकारणी सदस्य मा. श्री विजयजी अग्रवाल,मा श्री चंदू भाऊ अग्रवाल व सौ श्रद्धा अशोक अग्रवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राणी विनोद खरबडे आणि पर्यवेक्षीका सौ रजनी संजय निंबालवार हे सर्व मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षिका विजया सावरक ,डिम्पल अश्विन नागरेच,रेखा पाठक. सविता वाकपंजार, कु वृषाली दूध,सौ. सुमेधा सपकाळे, सौ अंजू जुननकर, सौ उमा बडगुजर, . कु.गायत्री उगले, सौ अश्विनी कठाने,सौ स्वाती गोलाईत, सौ मंजू मडघे, सौ आरती भुयार, सौ दिपाली गडलिंग, सौ प्रतिभा भावे, कु उज्वला पोटे, सौ मोहिनी कुंभारे तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग, सौ छाया पारखी,सौ वर्षा महाडिक, सौअनिता कोरे, सौ योगिता ठाकरे, व प्रीती राऊत यांच्या सहयोगाने व नियोजनामुळे कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंजू जूनंकर, कु. रीना कैकाडे व कु . वृषाली दुधे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.आरती भुयार यांनी केले एकूण ठरळपलेु 2025 या भव्य स्नेहसंमेलनाचे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button