बाजोरियाच्या सक्रीयतेने संभाव्य उमेदवार अलर्टमोडवर

शिंदे गटाचे उपनेते बाजोरिया अकोल्याचे

काँग्रेस, रवि राणा यांच्या संपर्क केल्याची माहिती

अमरावती/18 मे- अकोला जिल्ह्याचे माजी आमदार आणि शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचे उपनेते गोपीकिसन बाजोरिया यांनी आता अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
गेल्या आठवड्यापासून त्यांनी अमरावतीत आपली राजकीय हालचाल कमालीची वाढवली असून आ. राणा यांच्याशी दीड तास बंद दाराआड चर्चा केली आहे. तसेच काही काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतल्याने अमरावतीच्या राज कारणात सध्या मोठी खळ बळबळ उडाली आहे. ही सर्व मतांची गोळाबेरीज पाहता बाजोरिया यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि आव्हानात्मक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील असलेले आणि तेथूनच विधान परिषदेचे माजी सदस्य राहिलेले गोपीकिसन बाजोरिया हे सध्या अमरावती जिल्ह्यात स्वतःसाठी नवी राजकीय अस्तित्व शोधत आहेत. ते शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. बाजोरिया सध्या आमदार नसले, तरी त्यांच्या शब्दाला वजन असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अकोला जिल्ह्यात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी बाजोरिया यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता त्यांनी आपला मोर्चा थेट अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाकडे वळवला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर बाजोरिया यांनी स्वतः भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, निवडणूक लढवण्याची त्यांची तीव्र इच्छा असली तरी याविषयी पक्षनेतृत्वाचा आदेशच त्यांच्यासाठी अंतिम असेल. राजकीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, बाजोरिया यांच्यासाठी अमरावतीतून निवडणूक लढवणे सोपे नाही. कारण अमरावतीची ही जागा भारतीय जनता पक्ष स्वतः लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत महायुतीत शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा मिळणे कठीण आहे. जर बाजोरिया यांनी पक्षाचा आदेश डावलून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेस त्यांना अजिबात पाठिंबा देणार नाही. काँग्रेस नेत्यांनी आधीच जाहीर केले आहे की, ते कोणत्याही अपक्ष उमेदवाराला मदत करणार नाहीत, तर पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. यामुळे बाजोरिया यांच्या पुढील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
बाजोरियांची राजकीय कोंडी-राज्यपाल कोट्यात अपयश आल्यानंतर गोपीकिसन बाजोरिया अमरावतीतून नशीब आजमावत आहेत. मात्र महायुतीत भाजप ही जागा सोडण्यास तयार नाही आणि अपक्ष लढल्यास काँग्रेस मदत करणार नाही. त्यामुळे बाजोरियांची सध्या मोठी राजकीय कोंडी झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button