प्रहारच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर धडक

रेवसा येथील पूरग्रस्त लाभापासून वंचित

जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

अमरावती /13 नोव्हेंबर : जिल्ह्यातील रिवसा येथील पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना सन 2007 पासून अद्याप घराचे पैसे नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे दिनांक 13 नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती
पक्षाच्या वतीने मूक मोर्चा व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. व्यवसाय येथील पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना सन 2007 पासून अद्याप पर्यंत घराचे पैसे देण्यात आले नाहीत ते पैसे 2007च्या मूल्यांकनानुसार न देता आजच्या मूल्यांकनांचा देण्यात यावे ही भर गरजूंना घरे जागा उपलब्ध करून देण्यात यावी सर्व पूरग्रस्त पुनर्वशीत नागरिकांना नागरिक सुविधांच्या लाभ देण्यात यावा मंदिर मज्जित मध्यगारासाठी जागा आरक्षित करण्याच्या वेळी जागेचा आठवा नावाने घेण्यात यावा सातबारा तयार करून देण्यात यावा त्याचबरोबर पूरग्रस्त सुटलेले नागरिक यांना यादीत समाविष्ट करण्यात यावी अशा विविध मागण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगर प्रमुख बंटी भाऊ रामटेके व जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वातवतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रद्धा शारदा बबन बुधवंत यांच्या मार्फत पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, पोलिस आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी पूरग्रस्त पुनर्वसन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button