एफटीआयआय कॉलेजतर्फे आणुशची आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल स्पेनकरीता निवड

वरुड । 25 सप्टेंबर – शहरातील रहिवासी आणुश अश्वपाल शुभांगी वानखडे यांची एफटीआयआय कॉलेज तर्फे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल स्पेनसाठी निवड झाली आहे. आणुशच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ही स्पर्धा परीक्षेद्वारे भारतातील एकमेव फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) या कॉलेजमध्ये डिरेक्शनकरिता प्रवेश मिळवलेला पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. नवोदित डायरेक्टर म्हणून विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेझेंटेशन व त्यांनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्म्ससाठी प्रोत्साहन दिले जाते. यावर्षीही आणुश आणि त्यांचा गुजरातचा सहकारी विद्यार्थी मिलन कुमार या दोघांची स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल 21 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार असून आणुश 19 सप्टेंबरला भारतातून रवाना झाला आहे. या फेस्टिव्हलमध्ये आणुश ज्युरी म्हणून कार्य पाहणार असून जगभरातील नवोदित डायरेक्टरनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्म्सचे निरीक्षण करणाऱ्या टीममध्ये तो सहभागी होणार आहे. तसेच जगभरातील फिल्म मेकर्ससोबत त्यांची भेट होऊन त्यांच्यासमोर आपले आयडिया व फिल्मबाबत प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळणार आहे. ही नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याची व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मोठी संधी आहे. आणुश आणि मिलन कुमार हे दोघेही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या फेस्टिव्हलची विभागणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी व विषयांवर केली असून आणुशने घेतलेली ही गरुडझेप विदर्भातील एकमेव विद्यार्थी म्हणून गौरवास्पद आहे.

या प्रवासासाठी आणुशला विशेष मदत करणारे नितीन देवराव बनसोड, अमोल कुकडे, राहुल वानखडे, तन्वी पुरोहित, आदित्य आणि शिखा तिडके यांचे त्याने मनःपूर्वक आभार मानले आहेत. आणुशच्या यशाबद्दल माजी जि.प. सभापती गिरीश कराळे, वरुड तालुका सरकारी-निमसरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास टाकरखेडे, संस्थाध्यक्षा निनाद गव्हाळ, संतोष क्षिरसागर, वासुदेवराव लांडगे, गोपाळराव तायवाडे, आत्माराम निस्वादे, माजी प्राचार्य शशिकांत बेलसरे, डॉ. राम गोधणे, डॉ. रुपाली जैन, मोरेश्वर वानखडे, माजी मुख्याध्यापक अमोल कुकडे, यशपाल जैन, योगेश्वर खासबागे, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. मनोहर आंडे, अजय नागमोते, सुजित पाटील, राजेश गांधी, अनिल गुल्हाणे, हरिहर वरुडकर, माजी मुख्याध्यापक अरुण महल्ले, उध्दव भड, गोपाल चिमोटे, युवराज आंडे, दिपक दुपारे, मुख्याध्यापक ओ. प्रकाश दुपारे, मदन तायवाडे, संजय पाटील, संजय वाघ, अविनाश कुकडे, भारत दुपारे, अशोक ढवळे, लक्ष्मण झटाले, रघुनाथ दहीवडे, अशोक दहीवडे, माजी जि.प. सदस्य अनिल डबरासे, सुनिल डबरासे, अरविंद गजभिये, मनोज लांडगे, महेश्वर पवार, प्रमोद टाकरखेडे, सुशील बेले, रवी पंचभाई, राहुल लांडगे, उपसरपंच बंडू गोळे, नितीन आंजिकर, प्रमोद रडके, किरण टाकरखेडे, बाबाराव गणोरकर, माजी प्राचार्य दिपक थोरात, आनंद कुकडे, अरविंद नागले, वामनराव गडवे, ओ. प्रकाश गाडगे, विजय गुल्हाणे, अविनाश कोहळे, राजु देशमुख, गणेश मानकर, अन्सार भाई, अशपाक, चंद्रकांत भड, संदीप बहुरुपी, महेंद्र हरले, विलास पाटील, शरीफ, स्व. माणिकलाल गांधी जागृत महाविद्यालयाचे प्राचार्य विजय आडे, माजी उपप्राचार्या मंदा चौधरी, प्रा. दिपेश टाकरखेडे, प्रा. विजय इंगोले, प्रा. अमोल खासबागे, प्रा. गंगाधर दवंडे, प्रा. गजानन सोनारे, प्रा. अजय शिरभाते, प्रा. विकास विटाळकर, कैलाश गोंडेकर, मोहन चिमोटे, डॉ. माधवराव पानसे विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन ठाकरे, मुख्याध्यापक रमेश सहारे, माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर अढाऊ, वासुदेव चोपडे, माजी जि.प. सदस्य दिपक सलामे, रमेश कोरडे, अशोक कोरडे, अशोक ढोकणे, अनिल वाहने, संजय देशमुख, कपिल फुसे, विलास दुपारे, प्रशांत धुर्वे, सुनिल वटके, सुनील उईके, राजा वानखडे, केशवराव बोकडे, संदीप अढाऊ, अशोक ढोकणे, माजी मुख्याध्यापक संजय लांडे, चिमोटे, प्रल्हादराव बोबडे, माणिकदास बेलुरकर, माजी प्राचार्य विजय खुजे, माजी न.प. उपाध्यक्ष हरीश कानुगो, गोपाल धरमठोक, माजी मुख्याध्यापक भेलकर, सतीश फरकाडे, नितीन गणगणे, राजु भडके आदी मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button