केडिया सभेतर्फे अनिल अग्रवाल यांचा अभूतपूर्व स्नेह-सत्कार

अग्रसेन स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांचा गौरव

-कुलदेवी केड सती दादी यांचा मंगलपाठ
-महिला श्रद्धाळू भक्तिरंगात दंग
अमरावती / 25 ऑगस्ट : अमरावती शहरातील अग्रसेन भवन रविवारी श्रद्धा, भक्ती आणि स्नेहाच्या अनोख्या संगमाने उजळून निघाले. केडिया सभा, अमरावती तर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात कुलदेवी केड सती दादी व लांबी माता यांचे मंगलपाठ, पूजन आणि दैवी दरबाराचे आयोजन करण्यात आले. या मंगलमय वातावरणात अग्रसेन स्मारक समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल जुगलकिशोर अग्रवाल यांचा तसेच समितीतील पदाधिकार्‍यांचा भावपूर्ण व स्नेहसत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात देवींच्या सांची ज्योत प्रज्वलनाने झाली. आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि गगनभेदी जयघोषाच्या गर्जनेने परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला. मोहित केडिया यांनी मंगलपाठासह मनभावन भजनांची प्रस्तुती केली. त्यांच्या गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. महिलावर्गाने पारंपरिक वेशभूषेत, भक्तिभावाने आणि आनंदमय तालावर ठेका धरला. अग्रसेन भवनाच्या प्रत्येक कोपर्‍यात जय केड सती दादी आणि जय लांबी माता या घोषणा दुमदुमत होत्या.
या पारंपरिक दरबारात अनिल जुगलकिशोर अग्रवाल यांनी पूजन-अर्चन केल्यानंतर आपला सत्कार स्वीकारला. नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच गजेन्द्र शिवप्रसाद केडिया, राजेंद्र केडिया (राहुल इंडस्ट्रीज), कैलाश केडिया यांचा उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात, पुष्पहार व गगनभेदी घोषणांच्या साक्षीने स्नेहिल गौरव करण्यात आला. या सत्कारामुळे सत्कार मुर्तींना देवीची प्रत्यक्ष कृपा मिळते, अशा भावना व्यक्त केल्या. या सोहळ्याचे संचालन अग्रवाल समाज अध्यक्ष विजय केडिया यांनी केले तर दीपाली राहुल केडिया यांनीही सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील मान्यवर, केडिया सभेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांमध्ये विजय केडिया, राजेंद्र केडिया, रमेश केडिया, सुबोध केडिया, गजेंद्र केडिया, विनोद सरकीवाला, सुनील केडिया, लक्ष्मीकांत केडिया, कैलाश केडिया, संतोष केडिया, नरेंद्र छांवछरिया, सूर्यकांत केडिया, मनीष केडिया, प्रदीप केडिया, महेंद्र केडिया, प्रवीण केडिया, परमानंद सिंघानिया, रमेश रघुनंदन केडिया, वीरेंद्र गणेडीवाल, पवन चूडीवाला, डॉ. सतीश अग्रवाल, संदीप ककरानिया, अशोक अग्रवाल केबी, हनुमान प्रसाद अग्रवाल, शिवकुमार अग्रवाल, कृष्णकुमार अग्रवाल, विजय केडिया (सरपंच), अशोक केडिया, किशोर गोयनका, अजय चौधरी, धीरज केडिया, नीरज केडिया, चंदु केडिया, नीलेश केडिया, सुभाष केडिया, दिलीप केडिया आदींचा विशेष सहभाग होता.
महिलावर्गात सरिता केडिया, समता केडिया, अदिती केडिया, उर्मिला केडिया, मंजू केडिया, मीना केडिया, श्वेता केडिया, स्मिता केडिया, मीरा केडिया, अनुभा केडिया, विधि केडिया, दिपाली केडिया, रमा केडिया, निधि केडिया, निर्मला केडिया, सरिता अग्रवाल आदींनी उत्साहवर्धक उपस्थिती दर्शविली. अखेरीस जय जयकाराच्या गजरात व देवीच्या भक्तिगीतांच्या स्वरावलीत संपूर्ण वातावरण भारावून गेले. केडिया सभेच्या या आयोजनाने समाजातील ऐक्यभाव वाढीस लागला असून अनिल अग्रवाल यांच्या स्नेहिल सत्काराने नवनिर्वाचित पदाधिकारी आगामी कार्यकाळासाठी प्रेरित व ऊर्जित झाले, असे मत समाजातील वयोवृद्धांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button