अमरावतीच्या माळीपुर्‍यात तेजश बिलबिलेची हत्या

माळीपुरा निवासी कार्तीक बोरडे गंभीर

माळीपुरा निवासी कार्तीक बोरडे गंभीर

अमरावती /17 मे– अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या माळीपुरा भागात जुन्या वादातून तेजस श्रीकृष्ण बिलबिले वय 25 वर्ष, रा.नालसापुरा झेंडा चौक खोलापुरी गेट तर तेजसचा मित्र माळीपुरा निवासी कार्तीक दिगंबर बोरडे हा गंभीर झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे.
तेजस आणि कार्तिक हे दोघेही मित्र असून कार्तिकचा वाद हा जुन्या कारणावरुन सुरु होता, मोबाईलच्या मॅसेजवरुन हा वाद असल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिकचा वाद मिटविण्यासाठी तेजस ने पुढकार घेतला त्यात त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली.
या रक्तरंजित थरारामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून फरार मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. माळीपुरा भागातील या टोकाच्या वैराश्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. तेजस बिलबिले या तरुणाचा काटा नेमका कोणत्या कारणातून काढण्यात आला, याचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, यादृष्टीने पोलीस कसून चौकशी करत आहेत. घटनेची खबर मिळताच खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली असून संशयितांचा माग काढण्यासाठी शोध पथके रवाना करण्यात आली आहेत. या रक्तरंजित थरारामुळे स्थानिक लोकांमध्ये मोठी घबराट पसरली असून पोलीस गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवून आहेत. मारेकर्‍यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
माळीपुर्‍यात खळबळ-अमरावती शहरातील माळीपुरा भागात तेजस बिलबिले या तरुणाचा गेम झाल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. जुन्या वादातून हा काटा काढल्याची चर्चा असून खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या रक्तरंजित थरारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून पोलीस फरार मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button