अचलपूरच्या चांदूर बाजार नाक्यांवर प्रहार संघटनेचा चक्काजाम आंदोलन

अचलपूर /12 जून: सामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कांसाठी आज अचलपूर शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या चांदूर बाजार नाक्यावर सकाळी 9:00 वाजल्यापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आवाहनावरून करण्यात आले. सध्या बच्चू कडू गुरुकुंज मोझरी येथे सामान्य जनतेच्या हक्कांसाठी अन्नत्याग आंदोलन (अनशन) करत आहेत. हे आंदोलन प्रहार संघटनेच्या महाराष्ट्रभर चालू असलेल्या आंदोलनाचा एक भाग आहे.या आंदोलनात प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते तसेच विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहम्मद रजीक फ्रूट, शाकीर शहा फ्रूट, पंजाब बेदरकर, राधे डकरे, संजय टेटे, सय्यद असलम, बाकीर अन्सारी, हाडी सर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला.

संबंधित बातम्या

Back to top button