अवैधपणे गॅस रिफीलिंग करणार्या आरोपीस अटक
3,19,700 हजाराचा मुद्देमाल जप्त

*दोन प्रवाशी ऑटो आणि 8 घरगुती सिलेंडर हस्तगत
*गुन्हे शाखा युनिट 1 ची कडबी बाजार मसानगंजमध्ये कारवाई
अमरावती /15 जून: 15 जून 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारावर गुलिस्ता नगर परिसरातील युसूफ हॉल येथे घरगुती वापराचा एल.पी.जी. गॅस सिलेंडर अवैधरित्या ऑटोमध्ये रिफीलींग होत आहे. अशा खात्रीशीर माहितीवरुन गुन्हे शाखा युनिट क्र. 01 चे अधिकारी व अंमलदार यांनी गुलिस्ता नगर येथे छापा टाकला असता टीनाचे शेडमध्ये एक ईसम ईलेक्ट्रीकची गॅस रिफलींग मशीन तसेच एका प्लॉस्टीक पाईपचे सहाय्याने ऑटोचे गॅस टॅक मध्ये गॅस भरत असतांना मिळून आला तसेच सदर ठिकाणी दोन अॅटो हे गॅस भरण्यासाठी आलेले होते घरगुती वापराचे सिंलेडर मधुन ऑटोमध्ये रिफीलींग करीत असतांना मिळून आल्याने आरोपी शब्बीर खान ईब्राहिम खान वय 52 वर्षे रा. गुलिस्ता नगर, युसूफ हॉल जवळ पो.स्टे. नागपूरी गेट अमरावती यास ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी पो.स्टे. नागपूरी गेट यांचे ताब्यात देण्यात आले. नागपूरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळावरुन 3,19,700 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यामध्ये 4 नग भारत कंपनीचे घरगूती भरलेले सिलेंडर अंदाजे किंमत 9,600 रू., भारत कंपनीचे 4 घरगुती खाली सिलेंडर याची अंदाजे किंमत 6,400 रू., एक नियो कंपनीची गॅस फिलींग करीता वापरत असलेली मशीन अंदाजे किंमत 2,500रू., युनायटेड कंपनीचा एक इलेक्ट्रीक वजन काटा अंदाजे किंमत 1,200 रू., दोन प्रवाशी ऑटो अनुक्रमे अॅटो क्र.एमएच-27 बीडब्लयू 0021, अॅटो क्र. एमएच27/एएफ-3614 असा एकूण तीन लाख 19 हजार सातशे रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपाआयुक्त श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गाडगेनगर विभाग) अरुण पाटील, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे विभाग) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पो.उपनि.प्रकाश झोपाटे, पोहवा सतीष देशमुख, पोहवा फिरोज खान, पो.हे.कॉ. सचिन बहाळे, पो. हे. कॉ प्रशांत मोहोड, पो. हे. कॉ. अलीमउददीन खतीब, नाईक पोलीस अमंलदार नाझीमउद्दीन सैयद, विकास गुढधे, सचिन भोयर, पोलीस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, रंजित गावंडे चालक अशोक खंगार, किशोर खेंगरे, गुन्हे शाखा युनिट क्रमाक -01 यांनी केलेली आहे.