घरकाम करणार्‍या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

प्रसूतीनंतर उघड झाला खळबळजनक प्रकार

-आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
अमरावती / 8 सप्टेंबर : चिखलदरा येथे घरकाम करणार्‍या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती करणार्‍या अशोक मालवीय या युवकाविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी बलात्कार, पोक्सो कायदा तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
घरकामासाठी आरोपीच्या घरी जाणार्‍या या अल्पवयीन मुलीला अशोक मालवीय याने मोबाईलमध्ये चोरुन घेतलेल्या फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल केले. फोटो डिलीट करण्याचे आमिष दाखवून त्याने पीडितेला धमकावत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधांतून पीडिता गर्भवती झाली. काही दिवसांपूर्वी तिची प्रसूती झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आला.
प्रसूतीनंतर पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानुसार चिखलदरा पोलिसांनी आरोपी अशोक मालवीय याच्याविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायद्याच्या योग्य कलमे तसेच बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सद्यस्थितीत प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button