महिला महामंडळ कार्यालयात साहेबांच्या बर्थडेचा ‘केक’ कट

दिवसभराच्या पार्टीने जनता ताटकळत

* डान्स, रील्स, बुकेची धूम, तब्बल 17 कर्मचारी थिरकले

अमरावती /16 डिसेंबर : शासकीय कार्यालयात कर्मचारी अधिकार्‍यांचे रंगरंगीन कार्यक्रम सोशल मिडीयावर वायलर होत असतांना महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात साहेबांच्या बर्थडे केक कट केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि महिला आर्थिक विकास महामंडळचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषीकेश घ्यार यांचा 16 डिसेंबरला वाढदिवस होता. साहेबांचा वाढदिवस म्हणून कर्मचार्‍यांनी वर्गणी गोळा केली व चक्क कार्यालयातच बर्थडे केक कापण्याचा समारंभ केला.
जनतेच्या कामासाठी लाखो रुपयांचे वेतन घेणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी 16 डिसेंबर हा हॉलिडे समजला. दिवसभर साहेबांच्या बर्थडेची तयारी व पार्टीचे आयोजन यामध्येच सर्व कर्मचारी गुंतून होते. कार्यालयात येणार्‍या अभ्यांगतांना आज साहेबांचा बर्थडे आहे असे सांगून परत पाठविल्याची घटना घडली आहे. शासकीय कार्यालयात वैयक्तिक स्वरूपाचे वाढदिवस, समारंभ साजरे करू नये अशा मार्गदर्शक सूचना शासनाने दिलेल्या असतांना लाखो रुपयाचे वेतन घेणारे अधिकारी आपल्या मौजमस्तीमध्ये व्यस्त असतात, याप्रकाराची जनतेत प्रचंड चीड असून ऋषीकेश घ्यार यांच्या बर्थडे समारंभ आता वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरु झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिनेश शर्मा (लेखाधिकारी), रंजन वानखेडे, शुभम गुल्हाने (वर्ग-4 कर्मचारी) यांची उपस्थिती होती. वरिष्ठ व जबाबदार पदावरील अधिकार्‍यांच्या उपस्थितीतच नियमभंग झाल्याने, हे कृत्य अधिक गंभीर स्वरूपाचे ठरत आहे.

शासन निर्णय फक्त कागदापुरतेच ?

शासकीय कार्यालय जनतेच्या सेवेसाठी असतात, अधिकारी व कर्मचार्‍यांनी शिस्त पालन करणे व जनतेची सेवा करणे अपेक्षित असतांना बर्थडे सारखे कार्यक्रम करून स्वत:ची मौज करणे अपेक्षित आहे का. शासन मौजमस्तीसाठी भरमसाठ वेतन देते काय असा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे

संबंधित बातम्या

Back to top button