सुनिल चौथमल यांच्यासह 25 शिवसेना उबाठा पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप नेत्या नवनित राणा यांनी केले पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

अमरावती /16 नोव्हेंबर – धारणी नगर पंचायतच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले सुनिल चौथमल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आज जंगी प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा अमरावती येथील गंगा सावित्री निवासस्थानी भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा.खा. नवनित राणा यांच्या उपस्थितीत पार पडला.
सुनिल चौथमल आणि त्यांच्या सोबत प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून मा.खा. नवनित राणा यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विशेष म्हणजे सुनिल चौथमल यांच्या या प्रवेशाला भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा देखील पूर्ण पाठिंबा लाभला आहे. हा प्रवेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक प्रभारी महसुल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रेशखरजी बावनकुळे आणि अमरावती जिल्ह्याचे मुख्य निवडणूक प्रभारी संजय कुटे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार पार पडल्याचे मा.खा. नवनित राणा यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बोलताना मा.खा. नवनित राणा म्हणाल्या की,धारणीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सुनिल चौथमल यांचे भाजपामध्ये येणे हे धारणीच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. आगामी काळात आपण सर्वांनी एकजुटीने काम करुन धारणी व मेळघाटचा जास्तीत जास्त विकास करु. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चौथमल यांच्या प्रवेशाचे जोरदार स्वागत केले. धारणी नगर पंचायत निवडणुकीत या प्रवेशामुळे मोठे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. याप्रसंगी सौरभ चौथमल, ओम चौकसे, सुमित चौथमल, विनोद गुहे, सुनिल खराटे, दिनेश सेठिया, सुधा तिवारी, सचिन सोनाने यांच्यासह उबाठा गटाचे कार्यकर्ते तसेच आदिवासी, गवळी, डउ, कलार व ओ.बी.सी समाजाचे असंख्य बाधंव उपस्थित होते

संबंधित बातम्या

Back to top button