पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत विद्यापीठाचे घवघवीत यश

खेलो इंडिया स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ पात्र

* कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याकडून सत्कार

अमरावती /17 फेब्रुवारी : पारूल विद्यापीठ, वडोदरा (गुजरात) येथे 5 ते 11 जानेवारी, 2026 दरम्यान झालेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने उत्कृष्टरित्या खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यानंतर 30 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान कालिकत विद्यापीठ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतही खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन अमरावती विद्यापीठाने आठवे स्थान प्राप्त करुन खेलो इंडिया स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ पात्र ठरला आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी चमूंचे भरभरुन कौतुक करुन त्यांचा सत्कार केला व पुढेही अशाचप्रकारे आपल्या विद्यापीठाचा नावलौकीक करावा, अशा शुभेच्छा दिल्या. चमूंमध्ये मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हाचा ऋतिक अतकर, प्रज्योत तायडे व ओम काशीकर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा राज मिश्रा, डुकीवाकोर ही, ओमा हंग सुब्बा, झाकीइसतुओ केट्स, राहुल कुमार, पलडेन धोनडूप, अफिरमिंग तलंग व सोनम तमंग, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा साहिल बेनिवाले व सुफियान अब्दुल, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा ओम घारव व मुस्तफा शेख, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचा मोरवीन मोसेस, इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवचा अभिषेक बुटके व यश यादव, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा रोमन खान, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा रफिक खान यांचा समावेश होता. तर चमू व्यवस्थापक म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवचे डॉ. किरण पवार, प्रशिक्षक म्हणून डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचे राहुल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी चमूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button