घंटा वाजली, शाळा सुरु…

अमरावती/दि. 23 जुन: 2025-26 च्या शैक्षणिक सत्राला आज राज्यभरात सुरुवात झाली. अमरावती शहरातील गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने आज फुलून गेल्या. शासनाच्या आदेशावरुन शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्यावतीने शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अनेक दिवसांनंतर शाळेत राष्ट्रगीत, प्रार्थनेचे स्वर ऐकायला मिळाले. सकाळी गणवेश परिधान केलेल्या आपल्या पाल्यांना शाळेत सोडून देण्यासाठी पालकांचीही लगबग पाहायला मिळाली. 28 जूनपर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात होणार असून त्यानंतर नियमित वेळात शाळा भरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button