उद्धव ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीत दाखल?

एकनाथ शिंदे राजधानीकडे रवाना

मुंबई/16 जून- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. ते 6 खासदार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. तर खुद्द एकनाथ शिंदे हेदेखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या बंडाला ऑपरेशन टायगर असं म्हटलं जातंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदार पक्षातून बंड करत आहेत. बुधवारी (17 जून) ते सकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील या नव्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे देखील तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. रात्री साडे नऊ वाजता एकनाथ शिंदे चार्टर्ड प्लेनने मुंबईहून दिल्लीसाठी निघाले. तत्पूर्वी, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे संध्या काळीच काय देशीर सल्ला गारांच्या ताफ्या सह दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत काय देशीर टीम सोबत एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यामध्ये पुढील कायदेशीर प्रक्रियेची रणनीती ठरवली जाणार आहे. दिल्लीत पोहोचलेले हे 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला आपला पाठिंबा देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संभाव्य बंडामुळे ठाकरे गटाला संसदेत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

‘हे’ सहा खासदार

संजय दिना पाटील
संजय देशमुख
संजय जाधव
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाकचौरे

संबंधित बातम्या

Back to top button