हा सर्व पोरखेळ, दुबारवरून काँग्रेसची टीका

अहिल्यानगर : नुकतेच राज्य निवडणूक आयोगाने 29 महा पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. सोम वारी (15 डिसेंबर) राज्य निवडणुकी आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 15 जानेवारीला महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल समोर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने मनसेसोबत आंदोलन करत मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ दूर करा आणि मग निवडणुका घ्या, अशी मागणी करत आंदोलन केले होते. या दुबार मतदानाबाबत उपाययोजना केल्याचे आयुक्तांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, आता यानंतर विरोधाकांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.




