दिवाळीत राज्यात खांदेपालट होणार

आ.बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव/24 सप्टेंबर : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य खांदेपालटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिल्याचेही कडू यांनी म्हटले आहे. याचवेळी जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी स्पष्ट मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातून किशोर आप्पांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे. हवे तर जिल्ह्यात दोन मंत्रिपदे ठेवा, पण आप्पांना मंत्री करा, बच्चू असे कडू यांनी म्हटले. किशोर पाटील हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत असून, त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील जनतेला त्यांना मंत्रिपद मिळावे असे वाटणे स्वाभाविक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जोर लावणार का, असा प्रश्न विचारला असता, जर ‘जोर’ या शब्दाला काही किंमत असेल आणि त्या जोरावर मंत्रिपद मिळत असेल, तर आम्ही नक्कीच तो जोर लावू, असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button