राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही
मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

* पीएम मोदींच्या नेतृत्वात सरकार परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम
मुंबई/8 मार्च – इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिका आणि इस्त्रालयने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. आखाती देशातील या युद्धजन्य परिस्थितीमुळं भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. अशात महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेल आणि तेलावर या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना इंधन-तेलाच्या पुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे.
जागितक महिला दिनानिमित्त ‘नारीशक्ती संगम’ या कार्याक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बातचित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इंधन-तेलाच्या पुरवठ्याबाबत भाष्य केलं. त्यानुसार, दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार, असे माध्यमांनी चालवलं. त्यामुळं विनाकारण मोठ-मोठ्या रांगा पेट्रोल पंपांवर पाहायला मिळाल्या. मात्र भारतीय सरकरानं सांगितल्यानुसार कोणतीही कमतरता याची होणार नाही. त्यामुळं युद्धजन्य परिस्थिती आहे. तसेच आगामी काळात जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सक्षमपणे उभा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याशिवाय, पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत, त्यालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुर्णविराम दिला. त्यानुसार, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका. भारतीय सरकरानं तेल-इंधनाबाबतची त्यांची भूमिका योग्यपद्धतीनं मांडली आहे. भारताच्या एनर्जी सेक्यूरिटी संदर्भात पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेली पावलं आपल्यासमोर आली आहेत, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आणि रामभाऊ म्हाळगी प्रभोधिनीने राज्यभरातील नेतृत्व करणार्या ग्रामिण भागातील महिला जनप्रतिनिधी यांचे नारीशक्ती संगम या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. त्यानुसार, राज्यभरातून दोन दिवसांच्या प्रशिक्षण आणि प्रबोधनाकरीता सगळ्या महिला प्रतिनिधी आल्या आहेत.




