अंबरनाथमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

अंबरनाथ पूर्व– पश्चिम जोड णार्‍या उड्डाण पुलावर आज पहाटे भीषण अपघात झाला. वेगावर नियंत्रण सुट लेल्या कारने तीन मोटरसाय कलस्वारांना जबर धडक देत चिरडले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. संपूर्ण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. अपघातात कारचा ताबा चालकाकडून सुटल्याने वाहनाने उड्डाणपुलावर अनियंत्रितपणे अनेकांना धडक दिली. मृतांमध्ये शैलेश जाधव, चंद्रकांत अनारके, सुमित चैलानी यांचा समावेश असून, कारचा काढता ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अभिषेक चव्हाण, अमित चव्हाण यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button