सकाळी इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात
ठाकरे बंधूंवर आ. फुकेंनी टीका

-निवडणूक आली की मराठी प्रेम दाखवतात
मुंबई / 29 जून: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी विरोध केला आहे. याच मुद्यावरून भाजपचे नेते परिणय फुके यांनी ठाकरेंवर टीका केली. निवडणुका जवळ आल्या की मराठीचा म की महापालिकेचा म हे काही मला समजत नाही. माझा ठाकरे बंधूंना सवाल आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमातून शिकली आहेत. हिंदी, मराठी की इंग्रजी माध्यमांतून हे पण जरा सांगा. निवडणुका आल्या की मराठी प्रेम जागृत होतं. इतर वेळेला हे फक्त इंग्रजीवर प्रेम करतात. दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्रीची इंग्रजी पितात. त्यामुळे मला वाटतं की निवडणुकीच्या वेळेस यांचं मराठी प्रेम जागृत होतं. असं परिणय फुकेंनी खोचकपणे म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मांडीवर बसायचं आहे, असंच दिसून येतं आहे. त्यांच्या मनातली इच्छाच आता समोर आलं आहे. दोन भाऊ एकत्र आले तरीही दोन्ही भावजया एकत्र आल्या पाहिजेत. ते दोघं एकत्र आले तरीही काही फरक पडणार नाही अशीही बोचरी टीका परिणय फुके यांनी केली. निवडणुका जवळ आल्या की मराठीचा म की महापालिकेचा म हे काही मला समजत नाही. माझा ठाकरे बंधूंना सवाल आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमातून शिकली आहेत. हिंदी, मराठी की इंग्रजी माध्यमांतून हे पण जरा सांगा. निवडणुका आल्या की मराठी प्रेम जागृत होतं. इतर वेळेला हे फक्त इंग्रजीवर प्रेम करतात. दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्रीची इंग्रजी पितात. त्यामुळे मला वाटतं की निवडणुकीच्या वेळेस यांचं मराठी प्रेम जागृत होतं. असं परिणय फुकेंनी खोचकपणे म्हटलं आहे.




