252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश

मुंबई – मुंबईत बॉलीवूडच्या सेलिब्रिटींशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दुबईहून आणण्यात आलेला आरोपी मोहम्मद सलीम शेख याने चौकशीत अनेक नामांकित कलाकारांच्या देश विदेशातील पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ पुरवल्याचा दावा केल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
तपास अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम शेखने मुंबई, गोवा आणि दुबईतील आयोजित पार्ट्यांमध्ये कोकेनचा पुरवठा झाल्याचं संकेत दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक यादीत काही कलाकार व इतर व्यक्तींची नावं समोर आली आहेत.यात अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता-दिग्दर्शक अब्बास-मस्तान, अभिनेत्री नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी, तसेच हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांचा उल्लेख असल्याचं स्रोतांमधून समजतं. गुन्हे शाखेने यामधील सर्व व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवण्याची तयारी सुरू केली.




