दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे /13 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यंदा ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत पार पडेल, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. सभं., जीनगर, मुंबई, काल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये दहावी-बारावीच्या अंतिम परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन सुलभ व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आगाऊ जाहीर केले जात होते; परंतु यंदा काही महिन्यांनंतर म्हणजे 13 ऑक्टोबरला दहावी-बारावी परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाइन निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. तसेच, अगोदरची परु वणी परीक्षा साधारणत: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर घेतली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी तयारीसाठी वेळ मिळतो. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा देखील या मंडळाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी परु वणी परीक्षा लवकर घेतली जाते आणि निकाल लवकर जाहीर केला जातो. याच पार्श्वभूमीवर 2026 सालच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा साधारणत: 8 ते 10 दिवस आधी जाहीर केल्या असून, 18 मार्चपर्यंत परीक्षा पूर्ण करण्याचा मंडळाचा मानस आहे. यासंदर्भातील लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारावीची लेखी परीक्षा
* 10 फेब्रुवारी ते 18 मार्च
श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा,
अंतर्गत मूल्यमापन
* 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी
दहावीची लेखी परीक्षा
* 20 फेब्रुवारी ते 18 मार्च
श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा,
अंतर्गत मूल्यमापन
* 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवार




