मंत्री राठोड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात

मुंबई/15 जून– राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं प्रमाण वाढलं असून आता राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याही ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात चार पोलिस शिपाई जखली झाले आहेत. हा अपघात अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूजवळ झाला आहे. तर या अपघाताची भिषणता इतकी होती की वाहनाने तब्बल तीनवेळी पलटी खाली होती. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नसून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंत्री राठोड यांचा जळगाव जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा ठरला होता. त्याप्रमाणे आजचा पहिला दिवस होता. ते जळगाव येथील पोलिसांचा कार्यक्रम संपवून पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले होते.