भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्य

मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश

लाखनी जवळील पिंपळगाव परिसरात दुर्घटना

भंडारा/11 सप्टेंबर –राष्ट्रीय महामार्गावर लाखनी जवळील पिंपळगाव परिसरात झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू, तर 9 जण जखमी झाले आहेत. आज 11 रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जखमींवर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. छत्तीसगड राज्यातील काही महिला कार्यक्रमा निमित्त एकत्रित येत पिकअप वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. राष्ट्रीय महामार्गावर लाखनीच्या अलीकडे असलेल्या पिंपळगाव येथील मोटघरे पेट्रोल पंप आणि भाऊचा ढाबा या दरम्यान एक ट्रक पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत असताना वेगात येत असलेले पिकअपवाहन जोरात ट्रकवर मागेहून आदळळे. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. दरम्यान घटनास्थळीच अपघातातील आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर एक जण उपचारादरम्यान रुग्णालयात दगावला. मृतांमध्ये सहा महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

Back to top button